खुदीराम बोस
खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.[१]
खुदीराम बोस | |
---|---|
जन्म: | डिसेंबर ३, इ.स. १८८९ हबीबपुर, मिदनापूर जिल्हा, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (आजचा पश्चिम बंगाल, भारत) |
मृत्यू: | ऑगस्ट ११, इ.स. १९०८ मुझफ्फरपूर, बिहार, ब्रिटिश भारत (आजचा मुजफ्फरपूर, बिहार, भारत) |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | अनुशीलन समिती |
धर्म: | हिंदू |
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.[२]
न्यायाधीश किंग्जफोर्डला मारण्याची योजना
संपादनयातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्डला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.[३]
हे ही पहा
संपादन- मिदनापूर
- क्रांतिकारक
संदर्भ
संपादन- ^ "स्वतंत्रता आंदोलन के पहले शहीद खुदीराम बोस के बारे में जानिए-1". hindi.speakingtree.in (हिंदी भाषेत). 2020-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-23 रोजी पाहिले.
- ^ "स्वतंत्रता आंदोलन के पहले शहीद खुदीराम बोस के बारे में जानिए-Navbharat Times". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2018-08-23 रोजी पाहिले.
- ^ Krant; (क्रांत).), मदन लाल वर्मा (2006). स्वाधीनता संग्राम के क्रान्तिकारी साहित्य का इतिहास (हिंदी भाषेत). प्रवीण प्रकाशन. ISBN 9788177831191.