खिलाफत आंदोलन

मुस्लीम समाजाचे आंदोलन

खिलाफत चळवळ ही ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भारतीय मुसलमानांची चळवळ होती.

तुर्कस्तान हा जगातील सर्व मुसलमानाचा धर्मप्रमुख (खलिफा ) असल्याचे मानले जाते. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव होऊन त्याचे अनेक तुकडे पडण्याची भीती निर्माण झाली होती. तुर्कस्थानच्या सुलतानाचा हा अपमान भारतातील धर्मनिष्ठ मुस्लिमांना सहन झाला नाही. पण विजेत्या राष्ट्रांनी अखेर तुर्कस्थानची मोडतोड केलीच. त्यामुळे खलिफाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. यामध्ये ब्रिटनचा मुख्य हात होता , म्हणून

म. गांधीजीनी या संधीचा फायदा घेऊन मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा व असहकार चळवळीला मुसलमानांचा पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीलाच गांधीजीनी खिलाफत आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर करून टाकला. २४ नोव्हेंबर १९१९ रोजी म. गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे ' अखिल भारतीय खिलाफत काॅन्फरन्स ' भरविण्यात आली. हिंदुनी खिलाफत चळवळीला तन-मन-धनाने मदत करावी असे गांधीजीनी हिंदुना आवाहन केले आणि मुस्ल्मानानीपण असहकार चळवळीच्या मार्गानेच आपली चळवळ पुढे चालवावी असे प्रतिपादन केले. मुसलमानांनी हे मान्य केले व हिंदुनीही त्यांच्या चळवळीला मदत केली. अशा प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्य व मुसलमानांना असहकाराच्या चळवळीत सामील करून घेण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीजीनी पार पाडले.