खडकीसिम हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव तालुक्यात मेहूणबारे गावापासुन ३ कि.मी अंतरावर आहे. खडकीसिम गाव धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ पासून ०.८ किं.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे दोन भाग पडतात - जून गाव व बाबूराव वाडी खडकीसिम. गावात शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व गिरणा विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते. येथे गुरुदत्त जयंतीला जत्रा भरते. गावाजवळ तिन छोट्या नद्या एकत्र येतात त्यावर एक छोटे धरण देखील बांधलेले आहे.