मेहुणबारे

(मेहूणबारे या पानावरून पुनर्निर्देशित)

मेहुणबारे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - धुळे या राज्य महामार्गावर वसलेले आहे. गावाचे दोन भाग पडतात - जुने  गाव आणि नवे गाव. गावात शिक्षण व आरोग्याच्या उत्तम सोयी आहेत. शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व खाजगी शिक्षण संस्थेची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते. येथे आठवडे बाझार ही भरतो. येथे गुरुदत्त जयंतीला जत्रा भरते. गावाजवळून गिरणा ही नदी वाहते. गावाचा इतिहास फार प्राचीन असून गावात 2000 वर्षांपूर्वीचे श्री त्रिपुरसुंदरी मातेचे प्राचीन मंदिर,समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले श्री राम मंदिर, वारकरी संप्रदायाचे श्री विनायक-हनुमंत-शिव-शनी-विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री स्वामी समर्थ केंद्र इतर मंदिरे दर्शनीय आहेत. त्याचबरोबर गावामध्ये जैन स्थानक,मशीद, बुद्ध विहार ही आहेत. गावात हिंदू धर्मातील लोकांसोबतच मुस्लिम,बौद्ध,जैन धर्माचे लोकही राहतात.