पहिला कोसिमो दे मेदिची

(कोसिमो दि लुदोव्हिको दे मेदिची या पानावरून पुनर्निर्देशित)

पहिला कोसिमो दे मेदिची (१२ जून, १५१९ – २१ एप्रिल, १५७४) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेचा दुसरा आणि शेवटचा ड्यूक होता. याचा चुलतभाउ अलेस्सांद्रो दे मेदिचीची हत्या झाल्यावर कोसिमो ड्यूक झाला.[] १५३७-३९ दरम्यान या पदावर राहून तो नंतर तोस्कानाचा पहिला ग्रँड ड्यूक झाला. हा मरिया साल्व्हिआती आणि लुदोव्हिको दे मेदिचीचा मुलगा आणि कॅटेरिना स्फोर्झाचा नातू होता. कोसिमोची आई मरिया ही लॉरेंझो दे मेदिचीची नात होती. कोसिमो वडिलांकडून बांको दै मेदिचीच्या स्थापक जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीच्या पणतू जियोव्हानी इल पोपोलानोचा नातू होता.


याने सिएना जिंकून घेउन तोस्कानामधील फिरेंझेचे प्रजासत्ताक बळकट केले. त्याने आपले प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी फिरेंझे शहरात उफिझी (कार्यालय) बांधले. त्याने पलाझ्झो पित्तीचा विस्तार केला आणि बोबोली बागांचा मोठा भाग त्याच्या कारकिर्दीत तयार केला गेला.

वयाच्या १९व्या वर्षी कोसिमो
तोस्कानाचा ग्रँड ड्यूक कोसिमो दे मेदिची

अपत्ये

संपादन
 
कोसिमोची पत्नी तोलेदोची एलीनोर

कोसिमोला एकूण १५ अपत्ये झाली. त्यांपैकी त्याची पत्नी एलीनोर हिच्या सोबत ११ मुले होती:

त्याच्या पहिल्या लग्नाआधी कोसिमोला एका अज्ञात स्त्रीपासून अनौरस मुलगी होती:

१५६३मध्ये एलीनोरच्या मृत्यूनंतर कोसिमोला त्याच्या उपवस्त्र असलेल्या एलिओनोरा देग्ली अल्बिझ्झी पासून दोन मुले झाली:

  • एक मुलगी -- बाप्तिस्मा घेण्यापूर्वी मरण पावली
  • जिओव्हानी [] -- याला कोसिमोने नंतर दत्तक घेतले.

१५७० मध्ये, कोसिमोने कमिला मार्तेल्लीशी लग्न केले[] आणि तिच्यापासून तिला एक मुलगी झाली:

संदर्भ

संपादन
  1. ^ Fletcher 2016, पान. xvi.
  2. ^ a b Murphy 2008, पान. 63.
  3. ^ a b c Fossi 2001, पान. 20.
  4. ^ Loffredo 2022, पान. 176.
  5. ^ Langdon 2007, पान. 99.
  6. ^ Clifton 2016, पान. 174.
  7. ^ Bercusson 2017, पान. 164.
  8. ^ Sherrill 2006, पान. 136.
  9. ^ Davies 2009, पान. 27.