कोर्ले
कोर्ले (कोर्ला) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.
?कोर्ले महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी |
कोड • पिन कोड |
• ४१६७०१ |
भौगोलिक स्थान
संपादनकोर्ले गाव हे लांजा बस स्थानकापासून वेरवली रस्तामार्गाने हे १५ किमी अंतरावर वसले आहे. लांजा बस स्थानकावरून प्रभानवल्ली, हर्दखळे, साखरपा, कुरुंदवाड जाणाऱ्या एसटी बसेस कोर्ले येथे थांबतात. हिवाळ्यात थंड, उन्हाळ्यात उष्ण तर पावसाळ्यात समशीतोष्ण असे येथील हवामान आहे. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. ह्या गावाच्या बाजूने मुचकुंदी नदी बारमाही वाहत असते, त्यामुळे वर्षभर पाणी पुरवठा असतो.
लोकजीवन
संपादनकोर्ल्यात मुख्यतः मुस्लिम, मराठा, कुणबी समाजातील लोकांची पूर्वीपासून वस्ती आहे. भातशेती बरोबरच शेळी पालन, बकरी पालन आणि काही प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. मुचकुंदी नदीच्या पात्रात अगदी लहान प्रमाणात मासेमारी केली जाते. येथील बरेच लोक नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले आहेत, परंतु भातशेती करण्यासाठी ते दरवर्षी गावी येतात.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
नागरी सुविधा
संपादनकोर्ला ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक प्रकाशव्यवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता होतात. बाजारहाटासाठी लांजा या तालुक्याच्या ठिकाणी किंवा भांबेड येथील आठवडे बाजारात जावे लागते.
जवळपासची गावे
संपादनगोंडेसाखळ, केळंबे, विवळी, बुद्धवाडी तर्फे वेरवली बुद्रुक, मुसलमानवाडी, डोळस, रामगाव, वेरवली बुद्रुक, वेरवली खुर्द, पडवण, कातळगाव ही जवळपासची गावे आहेत.कोर्ले ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html