कोचीन विद्यापीठ
कोचीन विद्यापीठ हे केरळ राज्यातील एक विद्यापीठ. केरळ राज्यसरकारच्या १९७१ च्या कोचीन विद्यापीठीय अध्यादेशानुसार कोचीन येथे १० जुलै १९७१ रोजी ह्या विद्यापीठाची स्थापना झाली आणि श्री. के. सी. चक्को यांच्याकडे कुलगुरुपदाचे काम देण्यात आले. हे विद्यापीठ संघीय स्वरूपाचे असून त्याच्या क्षेत्रात कोचीन, अलवाये व परुर ह्या शहरांतील महाविद्यालये, तसेच १७ पंचायती ह्यांचा समावेश होतो. विद्यापीठात भौतिकी, सागरी जीवशास्त्र, महासागरविज्ञान, शालेय व्यवस्था, विधी आणि हिंदी भाषा ह्या विषयांच्या शाखोपशाखा आहेत. ह्याशिवाय सहा महाविद्यालयांनी आपल्याला घटक महाविद्यालयांचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. विद्यापीठात मुख्यत्वे पदव्युतर अभ्यासक्रमाचीच व्यवस्था असून पदवी अभ्यासक्रम विचाराधीन आहे. विद्यापीठीय कक्षांत वरील विषयांत अधिक संशोधन व्हावे, म्हणून प्रयत्न चालू असून सागरी – भूविज्ञान, रासायनिक महासागरविज्ञान वगैरे आणखी काही विषयांच्या शाखा नजीकच्या भविष्यकाळात सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. हे विद्यापीठ मुख्यत्वे पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी असून विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी आहे. १९७१-७२ मध्ये ३३२ विद्यार्थी या विद्यापीठात शिकत होते. विद्यापीठाच्या संकल्पित विकासयोजनांचा सर्वसाधारण खर्च ४·५ कोटी रु. येईल, असा अंदाज आहे.
State University in Cochin, Kerala, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय, सरकारी विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | कोची, एर्नाकुलम जिल्हा, केरळ, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||