कॉर्नवॉल
(कॉर्नवाल या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉर्नवाल (इंग्लिश: Cornwall; कॉर्निश: Kernow) ही इंग्लंडची एक काउंटी आहे. कॉर्नवॉल इंग्लंडच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला व पश्चिमेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी तर पूर्वेला डेव्हॉन काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॉर्नवॉलचा इंग्लंडमध्ये १२वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३९वा क्रमांक लागतो.
कॉर्नवॉल | |
---|---|
इंग्लंडची काउंटी | |
कॉर्नवॉलचा ध्वज | |
कॉर्नवॉलचे इंग्लंडमधील स्थान | |
भूगोल | |
देश | युनायटेड किंग्डम |
दर्जा | औपचारिक काउंटी |
प्रदेश | नैऋत्य इंग्लंड |
क्षेत्रफळ - एकूण |
१२ वा क्रमांक ३,५६३ चौ. किमी (१,३७६ चौ. मैल) |
मुख्यालय | ट्रुरो |
आय.एस.ओ. ३१६६-२ | GB-CON |
जनसांख्यिकी | |
लोकसंख्या - एकूण (२०११) - घनता |
४० वा क्रमांक ५,३६,००० १५१ /चौ. किमी (३९० /चौ. मैल) |
वांशिकता | |
राजकारण | |
संसद सदस्य | ६ |
जिल्हे | |
|
ऐतिहासिक काळापासून कॉर्निश लोकांची कॉर्नवॉलमध्ये वस्ती राहिली आहे. कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा येथील अल्पसंख्य भाषा आहे. ट्रुरो हे कॉर्नवॉलचे मुख्यालय व एकमेव शहर आहे. आर्थिक दृष्ट्या कॉर्नवॉल हा युनायटेड किंग्डममधील सर्वात गरीब भागांपैकी एक आहे. पर्यटन व तांब्याच्या खाणी हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |