उकडलेल्या कैरीचे पन्हे
(कैरीचे पन्हे या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
उकडलेल्या कैरीचे पन्हे हे महाराष्ट्र राज्यातील एक उन्हाळी पेय आहे.[१]
तयार करण्याची कृती
संपादनआवश्यक साहित्य : १ कैरी, गूळ, साखर, आलं, मीठ, वेलचीपूड, केशर
कृती : कैरी धुऊन वाफवावी. त्याचा गर काढावा. १ वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ व १ वाटी साखर असे प्रमाण घालावे. (साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे. कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलते.) १/२ चमचा मीठ घालावे . १/२ चमचा आल्याचा रस, १ चमचा वेलची पूड घालावे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून एकत्र करावे. अशा प्रकारे पन्ह्याचा बलक तयार करतात.
विशेष सूचना
संपादनयात केशर घातल्यास पन्ह्याला रंग व सुगंध येतो. प्रत्येकवेळी पिण्यासाठी पन्हे तयार करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे. अशाप्रकारे आंबट गोड चवीचे पन्हे तयार होते.
औचित्य
संपादनमहाराष्ट्रात चैत्रगौरी पूजन प्रसंगी कैरीचे पन्हे आवजून करण्याची पद्धती रूढ आहे.
- ^ सोवनी संपदा. "उदरभरण नोहे".