के.के. बिर्ला

भारतीय राजकारणी

कृष्ण कुमार बिर्ला ( ११ नोव्हेंबर १९१८,मृत्यु: ३० ऑगस्ट २००८) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी भारतात औद्योगिक परिवर्तन केले. ते बिट्स पिलानीचे कुलगुरूही होते. त्यांनी १९९१ मध्ये हिंदी भाषेच्या साहित्यास चालना देण्यासाठी के. के. बिर्ला फाउंडेशनची स्थापना केली. खत उत्पादनातही त्यांची मोलाची भूमिका होती.