केसराज कोतवाल या पक्षाला मराठीमध्ये केसराज कोतवाल (पु.) असे म्हणतात.इंग्रजीमध्ये Haircrested or Spangled Drongo असे म्हणतात.हिंदीमध्ये किशनराज,कृष्णराज,केसराज,केसिया असे म्हणतात.संस्कृतमध्ये केशराज अंगारक असे म्हणतात.तेलगुमध्ये येतिक पसल पोली गाडु असे म्हणतात.

केसराज कोतवाल
केसराज कोतवाल

मध्यम आकाराच्या मैनेएवढा इतर कोतवालांपेक्षा केसराज कोतवालाच्या शेपटीच्या टोकाची पिसे वरच्या बाजूला अधिक वळलेली.शेपटीचे टोक दुभंगलेले नसते.डोक्यावर केसासारखी दिसणारी लांब पिसे चोचीच्या मुळांतून आलेली असतात.हि पिसे सहजपणे दिसून येत नाहीत.

वितरण

संपादन

निवासी ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करणारे.कांग्रा खोऱ्यापासून पूर्वेकडे हिमालयाचा पायथा ते भूतान.अरुणाचल प्रदेश,बांगला देश,ब्रह्मदेश,बंगाल,बिहार,ओरिसा,मध्य प्रदेश,महाराष्ट्र (नागपूर आणि मुंबई).कर्नाटक आणि केरळ. उत्तर भारतात एप्रिल ते जून,तर दक्षिण भारतात मार्च ते एप्रिल या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

पानगळीची आर्द्र आणि सदाहरितपपर्णी वने.

संदर्भ

संपादन

पक्षीकोश लेखक:मारुती चितमपल्ली