केशभूषा करणारी नायर स्त्री (राजा रविवर्माचे चित्र)
केस सजवणारी नायर स्त्री किंवा नायर लेडी अॅडॉर्निंग हर हेअर हे राजा रविवर्मा यांचे १८७३ मधील एक चित्र आहे. यामध्ये घरगुती दृश्य दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये एक नायर स्त्री आरशासमोर फुलांच्या हाराने तिचे केस सजवते.
रविवर्मा यांनी पूर्ण केलेले पहिले मोठे पुरस्कार विजेते काम म्हणून हे काम उल्लेखनीय होते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवून, या पेंटिंगने तरुण रविवर्माला जागतिक कलात्मक समुदायाच्या लक्षांत आणले होते. तसेच त्यांना नंतर सर्वात प्रसिद्ध आधुनिक भारतीय चित्रकारांपैकी एक बनवले होते.