केरळ विधानसभा निवडणूक, २०११

केरळ विधानसभा निवडणूक २०११ ही भारताच्या केरळ राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १३ एप्रिल २०११ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व १४० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ह्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीवर केवळ ४ जागांनी विजय मिलवला. ओम्मेन चंडी केरळचे नवे मुख्यमंत्री बनले.

केरळ विधानसभा निवडणूक, २०१६
भारत
२००६ ←
१३ एप्रिल २०११ → २०१६

केरळ विधानसभेच्या सर्व १४० जागा
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता ओम्मेन चंडी व्ही.एस. अच्युतानंदन
पक्ष काँग्रेस माकप
आघाडी संयुक्त लोकशाही आघाडी डावी आघाडी
मागील निवडणूक ४२ ९८
जागांवर विजय ७२ ६८
बदल 25

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

व्ही.एस. अच्युतानंदन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

मुख्यमंत्री

ओम्मेन चंडी
काँग्रेस पक्ष

बाह्य दुवे

संपादन