उम्मन चंडी
केरळचे माजी मुख्यमंत्री, भारत
(ओम्मेन चंडी या पानावरून पुनर्निर्देशित)
उम्मन चंडी (मल्याळम: ഉമ്മൻ ചാണ്ടി; ३१ ऑक्टोबर १९४३ - १८ जुलै २०२३) हे भारताच्या केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ सदस्य होते. २०११ ते २०१६ दरम्यान मुख्यमंत्रिपदावर असणारे चंडी ह्यापूर्वी २००४ ते २००६ दरम्यान देखील राज्याचे मुख्यमंत्री होते.
उम्मन चंडी | |
कार्यकाळ १८ मे २०११ – २० मे २०१६ | |
मागील | व्ही.एस. अच्युतानंदन |
---|---|
पुढील | पिनाराई विजयन |
कार्यकाळ ३१ ऑगस्ट २००४ – १८ मे २००६ | |
मागील | ए.के. ॲंटनी |
पुढील | व्ही.एस. अच्युतानंदन |
जन्म | ३१ ऑक्टोबर, १९४३ कोट्टायम जिल्हा |
मृत्यू | १८ जुलै, २०२३ (वय ७९)[१] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | मरीअम्मा उम्मन |
२०१६ केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले व काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
संदर्भ
संपादन- ^ "माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन". दैनिक लोकमत. १८ जुलै २०२३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत