कृती सेनॉन
कृती सनॉन (२७ जुलै १९९० ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कृतीने त्याच साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिरोपंतीमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१५ सालच्या दिलवाले ह्या चित्रपटात देखील कृती आघाडीच्या भूमिकेत चमकली.
कृती सनॉन | |
---|---|
जन्म |
२७ जुलै, १९९० दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २०१० - चालू |
प्रमुख चित्रपट | पानिपत |
आरंभीचे आयुष्य
संपादनकृतीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्ली येथे राहुल सनॉन या चार्टर्ड अकाउंटंट आणि गीता सनॉन या दिल्ली विद्यापीठाचे भौतिकशास्त्र प्राध्यापक यांच्याकडे झाला. तिचे कुटुंब पंजाबी आहे. तिला एक छोटी बहीण असून तिचे नाव नूपुर सनॉन आहे. तिने दिल्ली पब्लिक स्कूल, आर के पुरम येथे शिक्षण घेतले आणि नंतर नोएडाच्या जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी मिळविली.
प्रसिद्ध चित्रपट
संपादनहीरोपंती, दिलवाले,लुका चुप्पी, हाउसफुल 4,
हम दो हमारे दो, मिनी
चित्रपट
संपादनवर्ष | चित्रपट | भूमिका | नोट्स |
---|---|---|---|
२०१४ | १: नेन्नोकाडिने | समीरा | तेलुगू पदार्पण चित्रपट |
२०१४ | हिरोपंती | डिंपी | हिंदी पदार्पण चित्रपट |
२०१५ | डोहचे | मीरा | तेलुगू चित्रपट |
२०१५ | दिलवाले | इशिता मलिक | |
२०१६ | राबता | सायरा/सायबा | |
२०१७ | बरेली की बर्फी | बिट्टी | |
२०१८ | स्त्री | आयटम गर्ल | "आओ कभी हवेली पे" गाण्यात |
२०१९ | लुक्का चुप्पी | रश्मी | |
२०१९ | कलंक | आयटम गर्ल | "ऐरा गेला" गाण्यात |
२०१९ | अर्जुन पटियाला | किती रंधावा | |
२०१९ | हाऊसफुल्ल ४ | राजकुमारी मधु/कृती | |
२०१९ | पानिपत | पार्वती बाई पेशवे | |
२०१९ | पती पत्नी और वो | नेहा खन्ना | पाहुणी कलाकार |
२०२० | अंग्रेजी मिडीयम | स्वतः | |
२०२१ | मिमी | मिमी |
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कृती सेनॉन चे पान (इंग्लिश मजकूर)