कुवे
कुवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.
?कुवे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी |
सरपंच | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१६७०१ • एमएच०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शहरानंतर ३ किमीवर वसलेले आहे. लांजा बस स्थानकातून वाटूळ, राजापूर, झर्ये,पाचळ इत्यादी गावाकडे जाणाऱ्या एसटी बसेस येथे थांबतात. रस्त्यावरच डाव्या बाजूला एक गणपती मंदिर आहे.
लोकजीवन
संपादनमुख्यतः कुणबी, मराठा,बौद्ध, मुस्लिम समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. फणस, काजू, हापूस आंबा, कोकम ह्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. आठवडा बाजारासाठी तसेच इतर सरकारी कामकाजासाठी लोकांना लांजा तालुका ठिकाणी जावे लागते.शेळीपालन,दुग्ध व्यवसाय धंद्याव्यतिरिक्त काथ उत्पादन येथे घेतले जाते.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
जवळपासची गावे
संपादनजावडे, खावडी, पुरगाव, आनंदगाव, पन्हाळे, निवोशी, बापेरे, रावरी, इसवली, खानवली, लावगण ही जवळपासची गावे आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html