कुलकर्णी चौकातला देशपांडे
कुलकर्णी चौकातला देशपांडे हा एक मराठी भाषेतील नाट्यमय चित्रपट असून तो गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. स्मिता फिल्म प्राॅडक्शनच्या बॅनरखाली स्मिता विनय गणू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन आल्पे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.[१] या चित्रपटात सई ताम्हणकरने बंडखोर मध्यमवर्गीय मुलीची मुख्य भूमिका केली आहे. या चित्रपटाने तिच्या आयुष्याच्या मार्गावरील वेगवेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडला आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे हा देखील मुख्य भूमिकेत आहे.[२]
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा हा ५०वा चित्रपट आहे.[३]
कलाकार
संपादन- सई ताम्हणकर
- राजेश शृंगारपुरे
- निखिल रत्नपारखी
- रोहन शाह
- नरेंद्र भिडे
- सौमिल शृंगारपुरे
- नीना कुलकर्णी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "KULKARNI CHAUKATLA DESHPANDE POSTER: SAI TAMHANKAR RESEMBLES A GIRL NEXT DOOR IN NEW POSTER" (इंग्रजी भाषेत). Pune Mirror India Times. 23 October 2019. 2021-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Take a look at the intriguing poster of Sai Tamhankar's next Kulkarni Chaukatla Deshpande". Times Now. 30 September 2019.
- ^ "Sai Tamhankar is a rebel in Kulkarni Chaukatla Deshpande". Box Office India. 30 September 2019. 2020-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 October 2019 रोजी पाहिले.