क्वांगशू
(कुआंगसु या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सम्राट क्वांगशू 光緒 | ||
---|---|---|
अधिकारकाळ | फेब्रुवारी २५, इ.स. १८७५ - नोव्हेंबर १४, इ.स. १९०८ | |
जन्म | ऑगस्ट १४, इ.स. १८७१ | |
मृत्यू | नोव्हेंबर १४, इ.स. १९०८ | |
पूर्वाधिकारी | थॉंगची | |
उत्तराधिकारी | शुआंतोंग | |
राजघराणे | छिंग |
सम्राट क्वांगशू (सोपी चिनी लिपी: 光绪 ; पारंपरिक चिनी लिपी: 光緒帝 'फीनयीन: Guāngxù ;) (ऑगस्ट १४ १८७१ - नोव्हेंबर १४ १९०८), जातनाम चाइत्यान (सोपी चिनी लिपी: 載湉 ; फीनयीन: Zaitian ;) हा मांचू छिंग वंशाचा दहावा आणि चिनावर राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात विधवा सम्राज्ञी त्सशी हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने शंभर दिवसांची सुधारक चळवळ सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले.