कुंमकोट या गावाचा जनगणना कोड ५३८७९८ आहे. हे गाव भारतातील महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात आहे. या गावाचे एकूण क्षेत्रफळ ३४७ हेक्टर आहे. कोरची येथे तहसीलदार कार्यालय असून ते या गावापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.[१]

राजदेव मंडई संपादन

या गावात दरवर्षी मंडईचे (यात्रा) आयोजन करण्यात येते. या मंडईला पंचक्रोशीत भाविकांची खूप मोठी गर्दी उसळते. कुंमकोट येथील मंडईला राजदेव मंडई असे संबोधले जाते. कुंमकोट येथील मंडई झाल्यानंतरच परिसरातील गावांमध्ये मंडईचे आयोजन केले जाते. त्यामुळेच कुंमकोट येथील मंडई पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंडईसाठी दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गावात राजमाता व मारुतीचे अतिशय जुने मंदिर आहे. कुंमकोट येथील मंडई पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंडईत वर्षागणिक भाविकांची गर्दी वाढत आहे. मंडईमध्ये खेळणी, झुले, कपडे, भाजीपाला, प्रसाद आधी विविध प्रकारची दुकाने लागतात. या उत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या गर्दीने कुंमकोट गावाचा परिसर फुलून जातो. मंडईच्या दिवशी राजमाता व इतर देवी- देवतांची विधिवत पूजा करण्यात येते. यासाठी गावकरी आयोजकांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना सोयीसुविधा पुरविल्या जातात. कुंमकोट राज राजेश्वरीदेवी-देवतांचे पूजेची सुरुवात राजवैद्य राजीमसाय रामसाय कल्लो या पुजारीकडून होत असून, सोबतीला ६० गावांतील पुजारी असतात. कोरची तालुक्यातील कुमकोट येथील मंडई प्रसिद्ध आहे. मंडईनिमित्ताने परिसरातील ६० गावांपेक्षा जास्त गावांतील पुजारी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने राजमातीची पूजा करतात. हातात साखळी, त्रिशूल, बांबूचे झेंडे पकडून मंडईच्या सभोवताल तीन फेरे मारले जातात. त्यानंतर पूजेचा शेवट होतो. फेरे बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. कोरची तालुक्यातील बहुतांश गावे छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत. त्यामुळे या गावांमधील नागरिकांवर आदिवासी संस्कृतीबरोबर छत्तीसगढी संस्कृतीचा प्रभाव आहे. मंडईनंतर रात्री छत्तीसगढी लोककला नृत्याचे आयोजन करण्यात येते. या नृत्याच्या माध्यमातून रात्रभर नागरिकांचे मनोरंजन होते.[२]चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे

संदर्भ संपादन

  1. ^ "Map of Kumkot village in Korchi tahsil, Gadchiroli, Maharashtra". villagemap.net (इंग्रजी भाषेत). 2023-01-06 रोजी पाहिले.
  2. ^ epaper.lokmat.com http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HGAD_20230106_1_12. 2023-01-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)