कीथ बॅरीश (११ नोव्हेंबर, १९४४ - ) हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आहे. सोफी चॉईस, द रनिंग मॅन आणि द फ्युजीटिव अश्या चित्रपटांचे निर्माते म्हणून त्यांनी काम केले[१].

कीथ बॅरिश
जन्म ११ नोव्हेंबर १९४४
लॉस आंजल्स
राष्ट्रीयत्व अमेरिका
पेशा अमेरिकन चित्रपट निर्माता

मागील जीवन संपादन

बॅरीशचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला होता. आई वडिलांनी घटस्फोट घेतल्यावर वयाच्या तिसऱ्या वर्षी तो मियामी येथे गेला.

कारकीर्द संपादन

बरीश यांनी १९७९ मध्ये चित्रपटाच्या निर्माता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९८१ मध्ये सर्वप्रथम अंतहीन प्रेम या चित्रपटाची निर्मिती केली, त्यांनी सोफी चॉईस या चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर बॅरीश यांनी  १९८० च्या दशकात टाफ्ट ब्रॉडकास्टिंगच्या सहाय्यक कंपनीच्या सह-स्थापनेत टाफ्ट एन्टरटेन्मेंट / कीथ बॅरीश प्रॉडक्शनचे अध्यक्ष म्हणून काम केले[२].

निर्मिती चित्रपट संपादन

चित्रपट वर्ष श्रेणी
एंडलेस लव १९८१ कार्यकारी निर्माता
सोफीस चॉईस १९८२
किस मी गुड बाय १९८२ कार्यकारी निर्माता
मिसअंडरस्टूडं १९८४ कार्यकारी निर्माता
९½ विक्स १९८६ कार्यकारी निर्माता
बिग ट्रबल इन लिटिल चायना १९८६ कार्यकारी निर्माता
द मॉन्स्टर स्कॉड १९८७ कार्यकारी निर्माता
द रनिंग मॅन १९८७ कार्यकारी निर्माता
आयर्नविड १९८७
द सरपंत अँड रेनबो १९८८  कार्यकारी निर्माता
हर अळंबी १९८९ 
फायर बर्डस १९९० कार्यकारी निर्माता
यू.एस. मार्शल १९९८ कार्यकारी निर्माता

बाह्य दुवे संपादन

कीथ बॅरीश आयएमडीबीवर

संदर्भ संपादन

  1. ^ Suplee, Curt (1981-06-07). "Washington Post" (इंग्रजी भाषेत). ISSN 0190-8286.
  2. ^ Harmetz, Aljean; Times, Special To the New York (1981-02-17). "The New York Times" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.