काळ्या डोक्याचा भारीट
काळ्या डोक्याचा भारीट किंवा काळ्या डोक्याची रेडवा (इंग्लिश:Black-headed Bunting; हिंदी:गंदम) हा एम्बेरिझिडे या भारीट कुळातील एक पक्षी आहे.
हा पक्षी चिमणीसारखा सडपातळ दिसतो. याची शेपटी लांब आणि दुभागालेली असते. नराचा रंग खालून गव्हाळी पिवळा आणि वरचा रंग लाल-भुरा असतो. डोक्यावर काळी टोपी असते. मादा नरांसारख्या पण फिकट रंगाच्या असतात. हे पक्षी थव्यात आढळतात आणि गवताळ प्रदेशात जमिनीवरील बिया खातात.
वितरण
संपादनहे पश्चिम आणि मध्य भारतात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र (नागपूर व नांदेड), तसेच कर्नाटक या भागांत हिवाळी पाहुणे असतात.
निवासस्थाने
संपादनते शेतीच्या प्रदेशात राहतात.