काळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

काळदुर्ग
नाव काळदुर्ग
उंची समुद्रसपाटीपासून १५०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव पालघर
डोंगररांग पालघर
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात अनेक डोंगरी किल्ले आहेत. ठाणे व जव्हारच्या सीमेवर असणारे हे डोंगरी किल्ले शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना हे किल्ले एका दिवसात आरामात पाहता येतात. येथे जंगल खूप असल्याने य़ेथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजही (२० २०साली) हा सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे.

इतिहास

संपादन

खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते.

इथे गडाच्या खाली तुम्हांला खूप माकडे दिसतील, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे. गडाच्याया खाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते


छायाचित्रे

संपादन

गडावरील ठिकाणे

संपादन

हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. किल्ल्यावरून सर्व घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

वाघोबा खिंड मार्गे : वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.

बाह्य दुवे

संपादन