काटेवाडी
कातेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. गावाच्या मध्य भागात ग्राम पंचायत कार्यालय व तसेच कै. सौदगर आप्पा क्षीरसागर सार्वजनिक वाचनालय आहे. गावात सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आनंदाने राहतात. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात मराठा(क्षिरसागर), धनगर(मासाळ) व महार (ओहळ) ही एकमेकांची भावकी मानली जाते, संपूर्ण भारतामध्ये असे एकमेव उदाहरण आहे जे की तीन वेगवेगळ्या जातीचे लोक एकमेकांची भावकी आहे.भावकीमुळे सर्वजण गुण्या गोविंदाने राहतात. गावात सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.
?कातेवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,०९३.६७ चौ. किमी |
जवळचे शहर | मोहोळ |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
२,०१२ (२०११) • २/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | भरत अशोक क्षीरसागर |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413213 • +०२१७ • एमएच/ 13 |
गावात रोजगार हा शेतीवर आधारित असून शिकलेला तरुण रोजगारासाठी, नोकरीसाठी पुणे व मुंबई कडे जातो. वर्षाकाठी दिवाळी, सण व महातम्यांच्या जयंती उत्सवासाठी एकत्रित येतात. गावात जिल्हा परिषद शाळा इयत्ता 7वी पर्यंत असून शाळेची इमारत ही अत्यंत देखणी आहे.शाळेभोवती अत्यंत सुंदर बगीचा आहे. गावात मारुती मंदिर, अंबाबाई मंदिर, मळसिद्धआप्पा मंदिर व अनेक मंदिरे आहेत. गावचे दळणवळण म्हणजे जवळपासचे गवे ही कुरुल व तालुक्याचे ठिकाण मोहोळ आहे.
भौगोलिक स्थान
संपादनगावचे क्षेत्रफळ सुमारे 1093.67 हेक्टर आहे.
हवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनकुरुल, सय्यद वरवडे, विरवडे बु, कामती व तालुक्याचे ठिकाण 17 किमी आहे.