कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ
(कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (आधीचे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) हे महाराष्ट्रातील जळगाव येथे स्थित एक विद्यापीठ आहे याची स्थापना १९९० साली झाली होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात.[१] विद्यापीठाचे आधीचे नाव (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) बदलून ते "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" असे करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून ८ कि.मी. अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. ४६ पासून दीड किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र ६५० एकर (२.७ चौरस किमी ) विस्तारलेले आहे.
ब्रीदवाक्य | अंतरी पेटवू ज्ञानज्योत। |
---|---|
Campus | शहरी, ६५०एकर |
अध्यासने
संपादन- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
- विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्रे सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.
संदर्भ
संपादन- ^ "विद्यापिठ संकेतस्थळ". विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले.