कल्हई
कल्हई म्हणजे तांब्याच्या वा पितळेच्या भांड्यांना आतल्या बाजूने कथलाचा पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे.[१] ॲल्युमिनियमची व स्टीलची भांडी वापरात येण्यापूर्वी तांब्याची वा पितळेचीच भांडी असत. या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये (कळकू नये) म्हणून त्यास कल्हई केली जात असे.
पद्धत
संपादनकोळसे पेटवून त्यावर कल्हई करावयाचे भांडेअत्यंत तप्त केले जाई. त्यात नवसागराची पूड टाकून ती कपड्याने भांड्यास आतून सर्व बाजूस लावली जात असे. उष्णतेमुळे नवसागरातून अमोनिया वायू बाहेर पडून भांडे स्वच्छ होई. त्यानंतर भांड्याचा आतून कथलाची रेघ मारून ती कपड्याचे साहाय्याने भांड्याच्या सर्व पृष्ठभागावर फिरवून कथलाचा एक अत्यंत पातळ थर निर्माण केला जाई. अशी कल्हई लावल्यानंतर लगेच भांडे थंड पाण्यात बुडवत. त्यामुळे कल्हई चकचकीत होते. ही कल्हई बरेच दिवस टिके. त्या भांड्यात ठेवलेले पदार्थ कळकत नसत. काही महिन्यांनी कल्हई उडून गेल्यावर मग पुन्हा त्या भांड्याला कल्हई करावी लागे.