कल्याणी प्रमोद बालकृष्णन ह्या तामिळनाडूतील चेन्नई येथील भारतीय वस्त्र कल्पक (टेक्सटाईल डिझाईनर) आहेत. त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून विणकरांसोबत काम केले आहे. या कामासाठी त्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे दिला जाणारा, खास महिलांसाठीचा इ.स. २०१६चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कल्याणी बालकृष्णन
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
नागरिकत्व भारत भारतीय
पेशा विणकर
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

प्रारंभिक जीवन संपादन

कल्याणी प्रमोद बालकृष्णन यांचे बालपण आणि शिक्षण तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे झाले.[१] बालकृष्णन यांनी राष्ट्रीय डिझाईन संस्थान (एन आय डी) येथुन टेक्सटाईल डिझाईन मध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर बुटीकचे दुकान सुरू केले. तामिळनाडूच्या निलगिरी हिल्सयेथील तोडा आदिवासी समाजा सोबत काम करून त्यांना त्यांची कलाकृती इंग्लंड मधील 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय' येथे सादर करण्यास प्रोत्साहन आणि मदत केली.[२] बालकृष्णन यांनी इ.स. २०१५ मध्ये 'रोजच्या जीवनातील उत्तरजीवित्व' नावाची एक दुलई (गोधडी) बनवली जी नंतर आयर्लंडमधील एका प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली.[१][३]

कारकीर्द संपादन

बालकृष्णन यांनी ग्रामीण विकास मंत्रालयात सहा वर्षांच्या दरम्यान तामिळनाडूच्या तेरा जिल्ह्यांतील १९,५०० विणकरांसोबत काम केले.[४] त्यानंतर तिने 'स्वमग्नता' (ऑटिझम) तसेच 'मेंदूचा पक्षाघात' (सेरेब्रल पाल्सी)चा आजार असलेल्या लोकांना विणकाम शिकण्यास मदत करण्यास सुरुवात केली.[५] अशा प्रकारच्या लोकांना दैनंदिन जीवनातील व्यवहार पार पाडणे देखील अवघड असते.[६][७] त्यांच्या या कार्याची दखल घेत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते इस २०१६चा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. यावर त्यांनी असे म्हटले की,

मी सध्या तरुण प्रौढांसह, मेंदूचा पक्षाघात आणि स्वमग्नता असलेल्या मुलांबरोबर काम करत आहे... मी त्यांची क्षमता काय आहे हे आधी तापसते आणि त्यांना अशा प्रकारे इनपुट देते की त्यांची उत्पादने वापरता येतील आणि ती लोकांद्वारे विकत घेतली जातील. मी नेहमीच विणकरांबरोबर काम करत असताना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचे बारकाईने निरीक्षण करत असते.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Textile details". CAIN. २५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Nari Shakti Puraskar 2016". UPSCSuccess. 10 March 2017. 14 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Event details". CAIN. 14 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b Special correspondent (9 March 2017). "Four from State receive Nari Shakti awards". The Hindu (इंग्रजी भाषेत). 14 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "'Nari Shakti' awards for four from state" (PDF). Gulf Times. 13 March 2017. p. 24. Archived from the original (PDF) on 2021-01-28. 14 January 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Landa RJ (2008). "Diagnosis of autism spectrum disorders in the first 3 years of life". Nat Clin Pract Neurol. 4 (3): 138–147. doi:10.1038/ncpneuro0731. PMID 18253102.
  7. ^ साचा:Vcite book