कर्ट वाल्डहाइम (जर्मन: Kurt Waldheim) हा एक ऑस्ट्रियन राजकारणी होता. तो १९७२ ते १९८१ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचा चौथा सरचिटणीस तर १९८६ ते १९९२ दरम्यान ऑस्ट्रियाचा नववा राष्ट्राध्यक्ष होता.

कर्ट वाल्डहाइम
कर्ट वाल्डहाइम


ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रियाचा नववा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
८ जुलै १९८६ – ८ जुलै १९९२
मागील रुडॉल्फ कर्चश्लागर
पुढील थॉमस क्लेस्टिल

कार्यकाळ
१ जानेवारी १९७२ – ३१ डिसेंबर १९८१
मागील उ थांट
पुढील हावियेर पेरेझ दे क्युलार

जन्म २१ डिसेंबर १९१८
व्हियेना
मृत्यू १४ जून २००७
व्हियेना
धर्म रोमन कॅथलिक
सही कर्ट वाल्डहाइमयांची सही

दुसर्‍या महायुद्धादरम्यान वाल्डहाइम नाझी जर्मनीच्या सैन्यातील एक गुप्तहेर होता. ह्या कारणामुळे त्याचे राष्ट्राध्यक्षपद वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. अमेरिकेने त्याला आपल्या देशात पाउल ठेवायला बंदी घातली होती.

बाह्य दुवेसंपादन करा