करड्या मानेचा भारीट किंवा करड्या मानेची रेडवा (इंग्लिश: Grey-necked bunting; हिंदी: जमजौहारा, दलचिडी, भारीट) हा एक पक्षी आहे.

करड्या मानेची रेडवा

हा आकाराने चिमणीएवढा असतो. नराच्या डोक्याचा वर्ण राखी असतो. त्याच्या डोळ्यांभोवती पांढरे ठळक कडे असतात. शेष भागाचा रंग तपकिरी असून त्यावर तांबूस झाक असते. पाठीवर गर्द रेघा असतात. शेपटी तपकिरी, दुभागालेली असते. कंठ लालसर पांढरा असतो. छाती तांबूस असते. मादी दिसायला नरासारखी, मात्र फिक्क्या वर्णाची असते.

वितरण

संपादन

हे पक्षी पश्चिम व मध्य भारत, उत्तर गुजरात, सिंध, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात आढळतात.

निवासस्थाने

संपादन

हे पक्षी पाषाणयुक्त झुडूपीप्रदेश, माळराने आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली