कनौजची सर्वधर्मपरिषद

कनौजची सर्वधर्मपरिषद ही सम्राट हर्षवर्धनाच्या काळात कनौज येथे इ.स. ६४३ मध्ये युवान श्वांग याच्या अध्यक्षतेखाली भरविली गेली होती. हर्षवर्धनाने त्याच्या साम्राज्यातील विविध धर्मपंथीयांना या परिषदेसाठी बोलाविले होते. बौद्ध धर्मातील महायानहीनयान पंथाचे ३००० भिक्षू, ३००० वैदिक ब्राह्मण, नालंदा विद्यापीठातील १००० विद्वान व जवळपास २० राजे या परिषदेला आलेले हाते. ही सर्वधर्मपरिषद तेवीस दिवस चालली होती व त्यासाठी हर्षवर्धनाने कनौज येथे मोठा विहार बांधला होता.