कडलूर
कडलूर (तमिळ: கடலூர்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७३,६७६ होती.
हे शहर कडलूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
इतिहास
संपादनअमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या सुमारास फ्रेंचांनी इंग्लंडच्या इतर वसाहतींवर हल्ला केला होता. त्यावेळी १७८२मध्ये फ्रेंचांनी कडलूर जिंकून घेतले. १७८३मध्ये इंग्रजांनी शहराला वेढा घातला. हा वेढा फसला परंतु १७९५मध्ये कडलूर परत इंग्रजांच्या ताब्यात आले.