कजरी पौर्णिमा
कजरी पौर्णिमा हा भारत देशातील एक सांस्कृतिक सण आहे.[१] छत्तीसगड राज्यातील कृषी संस्कृतीशी संबंधित हा सण असून ज्यांना मुलगा आहे अशा विवाहित स्त्रिया हा सण मुख्यत्वे साजरा करतात.या जोडीने मध्य प्रदेश,गुजरात, राजस्थान या प्रांतात सुद्धा या सणाचे महत्व आहे.[२]
स्वरूप
संपादनमहिला या दिवशी ओल्या मातीत धान्य पेरतात आणि त्याची पूजा करतात. श्रावण महिन्यातील नवमी अथवा पौर्णिमा तिथीला हे पूजन केले जाते. संध्याकाळी कजरी देवतेची मिरवणूक काढली जाते. जत्रेमध्ये कलाकार आपली कला सादर करतात.[३]
संदर्भ
संपादन- ^ Chanchreek, K. L. (2007). Encyclopaedia of Great Festivals (इंग्रजी भाषेत). Shree Publishers & Distributors. ISBN 978-81-8329-191-0.
- ^ Kumar, Tumuluru Kamal (2015-04-21). Hindu Prayers, Gods and Festivals (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 978-1-4828-4708-6.
- ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar: Bharatiya Parva Evam Tyohar: Celebrating India's Cultural Festivals (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-617-5.