कंबरलँड नदी
कंबरलॅंड नदी अमेरिकेच्या केंटकी आणि टेनेसी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी ॲपेलेशियन पर्वतरांगेत उगम पावते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीला मिळते. कंबरलॅंड नदीचा प्रवाह १,१०७ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४७,००० किमी२ आहे. या नदीवर अनेक बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो.
हा लेख टेनेसी आणि केंटकीमधील कंबरलॅंड नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कंबरलॅंड नदी (निःसंदिग्धीकरण).
नॅशव्हिल आणि क्लार्क्सव्हिल शहरे या नदीकाठी आहेत.