सूर्यग्रहण

(कंकणाकृती सूर्यग्रहण या पानावरून पुनर्निर्देशित)

जेव्हा चंद्र हा सूर्यपृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण हे अमावस्या दिवशी दिसते. परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्वच अमावस्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पृथ्वीच्या कक्षेत आणि चंद्राच्या कक्षेत पाच अंशाचे किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असते परंतु अमावस्याला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते.

पाहताना घ्यावयाची काळजी:

दुर्बिण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये. साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. सूर्य ग्रहण solar eclipse time in india     पाहण्यासाठी सुरक्षित काळी वेल्डिंग काच,फिल्टर किंवा सुरक्षित चष्मा वापरावा. विशेष काळजी घ्यावी.[]

 

खग्रास सूर्यग्रहण

संपादन
 
खग्रास सूर्यग्रहण व सूर्याचे तेजोवलय

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.

खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) असतो.

खंडग्रास सूर्यग्रहण

संपादन

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण

संपादन

जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.

  1. ^ "solar eclipse time in india". 2020-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले.