अक्षौहिणी
(औक्षाहिणी या पानावरून पुनर्निर्देशित)
प्राचीन भारतातील युद्धशास्त्रात, सैन्य रचनेच्या महत्तम एककास 'अक्षौहिणी' म्हणले जात असे. हे एक सैन्यदल मोजण्याचे एक एकक होते.
एका अक्षौहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती.
१ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति(पायी सैनिक)
३ पत्ति = १ सेनामुख
३ सेनामुख = १ गुल्म
३ गुल्म = १ गण
३ गण = १ वाहिनी
३ वाहिनी = १ पृतना
३ पृतना = १ चमू
३ चमू = १ अनीकिनी
१० अनीकिनी = १ अक्षौहिणी
एक अक्षौहिणी सैन्यात एकूण सैन्य:
१,१०,००० पायदळ
६५,००० घोडदळ
२१,८७० हत्तीदल
२१,८७० रथदल
महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने ११ अक्षौहिणी तर पांडवाच्या बाजूने ७ अक्षौहिणी सैन्य लढले होते. म्हणजे, एकूण १८ अक्षौहिणी सैन्य कुरुक्षेत्रावर लढाई लढले.[१]
संदर्भ
संपादन- ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "अक्षौहिणी म्हणजे काय?" Check
|दुवा=
value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले.ज्ञानरंजन