ओ.पी. शर्मा (छायाचित्रकार)

ओ.पी. शर्मा (जन्म:१९३७) हे दिल्लीतील एक भारतीय छायाचित्रकार आहेत. ते त्रिवेणी कला संगमच्या छायाचित्रण विभागाचे प्रमुख आहेत.[] यापूर्वी त्यांनी मॉडर्न स्कूलमध्ये अनेक वर्षे फोटोग्राफीचे शिक्षण दिले. त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भारतात तसेच इतर देशांमध्ये अनेक ठिकाणी भरवण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्कार आणि विविध सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. याच सोबत १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण समुदायाला एकत्रित करण्याचे श्रेय त्यांना जाते.[][]

ओ.पी. शर्मा
जन्म १९३७
आग्रा
निवासस्थान दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतभारतीय
पेशा छायाचित्रकार
ख्याती जागतिक छायाचित्रण दिवस

वैयक्तिक जीवन

संपादन

ओपी शर्मा यांचा जन्म १९३७ साली आग्रा, येथे झाला होता.[][] त्यांनी ख्रिश्चन कॉलेज, लखनौ येथे शिक्षण घेतले आणि लखनौ विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. लखनौमध्येच त्यांना छायाचित्रकार म्हणून ओळख प्राप्त झाली.[] लखनौ युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी त्यांना तेथील डार्करूम दिली, जी की छायाचित्र कलेसाठी अत्युत्तम मानली जात असे. निगेटिव्हची अचूक प्रतिकृती असलेली प्रिंट कशी मिळवायची हे शर्मा स्वतः शिकले. तेव्हापासून त्यांनी नेहमीच त्यांची सर्व डार्करूमची कामे स्वतःच केली आहेत.

कारकीर्द

संपादन

शर्मा १९५८ मध्ये दिल्लीला गेले आणि त्यांनी मॉडर्न स्कूलमध्ये फोटोग्राफीचे शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८० मध्ये त्यांनी त्रिवेणी कला संगम (TKS) येथे शिकवण्यास सुरुवात केली, जिथे ते आठवड्यातून तीन वेळा फोटोग्राफीचे वर्ग घेत असत. मॉडर्न आणि TKS या दोन्ही ठिकाणी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, जे पुढे चालून व्यावसायिक छायाचित्रकार बनले. त्यापैकी काहींनी, जसे की सादिया कोचर आणि विक्की रॉय यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. TKS येथे छायाचित्रणाची ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ एक लघुपट तयार करण्यात आला आहे.[]

मॉडर्न स्कूलमध्ये, शर्मा यांची अनेक नामांकित लोकांशी भेट झाली, ज्यांचे शर्मा यांनी स्टुडिओ पोर्ट्रेटसाठी विविध पोज घेतल्या. बेगम अख्तर, पंडित जसराज, फैज अहमद फैज, केएम करिअप्पा आणि राजीव गांधी हे त्यापैकी काही लोक होते .

१९७० च्या दशकात शर्मा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले. छुपा रुस्तम, दो बूंद पानी, सिद्धार्थ आणि शालीमार या चित्रपटांसाठी त्यांनी स्थिर छायाचित्रण केले.

फोटोग्राफीच्या जन्माचे स्मरण करणारा दिवस (जागतिक फोटोग्राफी दिवस) ची कल्पना सर्वप्रथम शर्मा यांना १९८८ मध्ये आली. त्यांनी याबाबत एका मुलाखतीत म्हटलेकी: "... फोटोग्राफीच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या विविध प्रकाशनांमध्ये, मला १९ ऑगस्ट १८३९ ही तारीख आढळली. तत्कालीन फ्रेंच सरकारने 'जगाला मोफत भेट' म्हणून फोटोग्राफीच्या 'डॅग्युरेओटाइप' प्रक्रियेचा शोध लावल्याची तारीख म्हणून नोंद करण्यात आली होती."[]

शर्मा यांनी भारतात आणि परदेशात फोटोग्राफी समुदायामध्ये या कल्पनेचा प्रसार करण्यासाठी स्थापना केली. शर्मा यांनी स्वतः स्थापन केलेल्या इंडियन इंटरनॅशनल फोटोग्राफिक कौन्सिलने १९९१ मध्ये पहिला छायाचित्रण दिवस साजरा केला होता. [] त्यानंतर, शर्मा फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका आणि रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन यांना सहभागी होण्यासाठी राजी करण्यात देखील यशस्वी झाले. आतापर्यंत, १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.[]

ओपी शर्मा यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • प्रॅक्टिकल फोटोग्राफी, ओपी शर्मा, फुल सर्कल, 2003.आयएसबीएन 9788121600309 .
  • व्हिजन फ्रॉम द इनर आय: द फोटोग्राफिक आर्ट ऑफ एएल सय्यद, ओपी शर्मा, मॅपिन पब्लिशिंग, 2006.आयएसबीएन 9781890206284ISBN 9781890206284 .

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • ऑनररी फेलो, रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन, 2000.[]
  • फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका :
    • फेलो 1991
    • मानद सहकारी 1994.[१०]

प्रदर्शन आणि स्पर्धांमध्ये शर्मा यांच्या कामांमुळे त्यांना सुमारे सहाशे पुरस्कार मिळाले आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Department of Art - Triveni Kala Sangam". trivenikalasangam.org. 24 May 2019 रोजी पाहिले.
  2. ^ a b "OP, the man who started it all". dnaindia.com. 24 May 2019 रोजी पाहिले.
  3. ^ a b Tripathi, Shailaja (27 September 2013). "Lens and the man". The Hindu. 24 May 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Dr. O. P. Sharma". Camera Art Institute. 20 December 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ Mutreja, Neha. "O P Sharma". Better Photography. 2023-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 May 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Triveni Kala Sangam and its Photography Department: A Commemoration". Alkazi Foundation. 28 February 2021 रोजी पाहिले.
  7. ^ a b "The big picture - Harmony Magazine". harmonyindia.org. 1 June 2019 रोजी पाहिले.
  8. ^ Artaius, James. "Happy World Photography Day 2020! Here's how it all started in 1839". Digital Camera World. 4 April 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Honorary Fellowships - RPS". Royal Photographic Society. 14 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 June 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Honors Recipients: Photographic Society of America". psa-photo.org. 9 June 2019 रोजी पाहिले.