ओव्हिड
पाब्लियुस ओव्हिदियस नासो (लॅटिन: Publius Ovidius Naso; २० मार्च, इ.स. पूर्व ४३ - इ.स. १७/१८) हा एक रोमन कवी होता. त्याची मेटामॉर्फोसिस ही लॅटिन कविता जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यापैकी मानली जाते.
व्हर्जिल व होरेस ह्या समकालीन कवींसह ओव्हिड लॅटिन साहित्याच्या तीन मार्गदर्शक स्तंभांपैकी एक मानला जातो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत