ओमर बॉंगो (इंग्लिश: El Hadj Omar Bongo Ondimba; ३० डिसेंबर १९३५ –८ जून २००९) हा गॅबन देशातील एक राजकारणी व देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ ते मृत्यूपर्यंत २००९ पर्यंत ४१ वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्षपदावर राहणारा बॉंगो जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहे.

ओमर बॉंगो
Omar Bongo cropped.jpg

गॅबन ध्वज गॅबनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ डिसेंबर १९६७ – ८ जून २००९
मागील लिओन एम्बा
पुढील अली बॉंगो ओंडिंबा

जन्म ३० डिसेंबर १९३५ (1935-12-30)
लेवाई, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका (आजचा गॅबन)
मृत्यू ८ जून, २००९ (वय ७३)
बार्सिलोना, स्पेन
धर्म सुन्नी इस्लाम

गॅबनमधील खनिज तेल व इतर नैसर्गिक संपत्तीमुळे बॉंगोच्या कार्यकाळात गॅबनची भरभराट झाली परंतु त्यामधील मोजकाच निधी जनतेपर्यंत पोचला. बॉंगो व त्याच्या कुटुंबियांनी कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचे आरोप त्याच्यावर झाले होते. बॉंगोचे फ्रान्ससोबत विशेष जवळीकीचे संबंध होते.

८ जून २००९ रोजी बार्सिलोना येथे बॉंगोचे कर्करोगाने निधन झाले. त्याचा मुलगा अली बॉंगो ओंडिंबा हा गॅबनचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

बाह्य दुवेसंपादन करा