ऑपेरा (वेब न्याहाळक)

(ओपेरा (वेब न्याहाळक) या पानावरून पुनर्निर्देशित)


ऑपेरा हा ऑपेरा सॉफ्टवेर यांनी तयार केलेला आंतरजाल न्याहाळक व आंतरजाल सूट असून त्याचे जगभरात २०० लक्षांहून जास्त वापरकर्ते आहेत. ऑपेरा सामान्य आंतरजाल-संबंधित कामे हाताळू शकतो, उदा. जालावरील पाने दाखवणे, विपत्र पाठवणे व प्राप्त करून घेणे, संपर्क व्यवस्थापन करणे, आयआरसीवर चॅटिंग करणे, बिटटोरेंटद्वारा संचिका उतरवून घेणे व वेब फीड वाचणे. ऑपेरा व्यक्तिगत संगणक तसेच भ्रमणध्वनींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ऑपेरा
ऑपेरा ११.६१ विकिपीडिया दाखवताना
ऑपेरा ११.६१ विकिपीडिया दाखवताना
विकासक ऑपेरा सॉफ्टवेर एएसए
प्रारंभिक आवृत्ती १९९४ च्या शेवटी
सद्य आवृत्ती ११.६४
(मे १८, २०१२)
सद्य अस्थिर आवृत्ती १२.०० अल्फा (बिल्ड १४२९)
(मे २५, २०१२)
विकासाची स्थिती कार्यरत
प्रोग्रॅमिंग भाषा सी++
संगणक प्रणाली फ्रीबीएसडी
लिनक्स
विंडोज
सोलारिस
भाषा ५१
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक व आंतरजाल सूट
सॉफ्टवेअर परवाना मोफत प्रताधिकारित, काही मुक्तस्रोत घटकांसह
संकेतस्थळ

ओपेरा.कॉम. Com.whatsa

pp.

|ऑपेरा हा न्याहाळक काही देशांत अत्यंत लोकप्रिय आहे, उदाहरणार्थ युक्रेन. ऑपेरा मिनी हा भ्रमणध्वनींसाठीचा सर्वांत लोकप्रिय आंतरजाल न्याहाळक आहे. अनेक भ्रमणध्वनींमध्ये तो आधीच असतो.

ऑपेरामध्ये टॅबद्वारे[मराठी शब्द सुचवा] न्याहाळणे, पान मोठे / लहान करणे, माऊसद्वारे लघुपथ व अगोदरपासूनच असलेला उतरवलेल्या संचिकांचा व्यवस्थापक ह्या सुविधा आहेत. ऑपेरामध्ये आधी सादर केलेल्या अनेक नवीन सुविधा आताइतर न्याहाळकांमध्ये घेण्यात आल्या आहेत.

ऑपेरा अनेक व्यक्तिगत संगणकांसाठीच्या संचालन प्रणाल्यांसाठी उपलब्ध असून त्यात विंडोज, ओएस एक्स, लिनक्सफ्रीबीएसडी आहेत. माएमो, ब्लॅकबेरी, सिंबियान, विंडोज भ्रमणध्वनी, अँड्रॉइडआयओएस यांसाठीही ऑपेराच्या आवृत्त्या उपलब्ध आहे. १२०० लक्ष भ्रमणध्वनींमध्ये ऑपेरा न्याहाळक आहे. संगणकीय खेळांसाठीच्या उपकरणांवरही हा उपलब्ध आहे.

इतिहास

संपादन

ऑपेरा हा टेलेनॉर या नॉर्वेच्या सर्वांत मोठ्या भ्रमणध्वनी सेवा कंपनीतला प्रकल्प म्हणून १९९४ मध्ये सुरू झाला. १९९५ मध्ये ऑपेराची वेगळी कंपनी ऑपेरा सॉफ्टवेर ही स्थापन झाली. ऑपेरा २.० ही ऑपेराची आवृत्ती सर्वांसाठी १९९६ मध्ये प्रकाशित झाली. ती फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोजवरच चालू शके. ऑपेरा ४.० ही ओपेराची अनेक संचालन प्रणाल्यांवर चालू शकणारी पहिलीच आवृत्ती होती.

ऑपेराच्या ४.० पर्यंतच्या आवृत्त्या या काही काळ वापरल्यानंतर विकत घ्याव्या लागत.  ऑपेरा ५.० मध्ये मात्र या काळानंतर पैसे न भरल्यास जाहिराती दिसत. ऑपेरा ८.५ मध्ये मात्र जाहिराती काढून टाकण्यात आल्या.