ओटागो ओव्हल विद्यापीठ

युनिव्हर्सिटी ओव्हल हे न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.

हे मैदान पूर्वी ओटेगो विद्यापीठाच्या मालकीचे होते. २००० च्या दशकात हे मैदान ड्युनेडिन महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले व त्याची पुनर्बांधणी करण्यात आली.