ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने मे १९७६ मध्ये दोन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६
वेस्ट इंडीज महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख ७ – १६ मे १९७६
संघनायक लुसी ब्राउन ॲनी गॉर्डन
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये वेस्ट इंडीजचा असा सामुदायिक संघ नव्हता. त्यावेळी जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या महिला क्रिकेट संघांनी स्वतंत्रपणे सहभाग घेतला होता. १९७३ च्या विश्वचषकानंतर इसवी सन १९७५ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला संघाची स्थापना करण्यात आली. त्रिनिदादच्या लुसी ब्राउनकडे संयुक्त वेस्ट इंडीज महिला संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. संघाचे गठन झाल्यावर ऑस्ट्रेलियन महिला संघ आपल्या वहिल्या करैबियन दौऱ्यसाठी जमैकात दाखल झाला. ७ मे १९७६ रोजी वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला कसोटी पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने २ सामन्यांची महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

महिला कसोटी मालिका

संपादन

१ली महिला कसोटी

संपादन
७-९ मे १९७६
धावफलक
वि
२८२ (११२.५ षटके)
लुसी ब्राउन ६७
मारी कॉर्निश ४/४८ (२२ षटके)
२६८/८ (११९ षटके)
लोर्रेन हिल ७३
विव्हालिन लॅटी-स्कॉट ५/४८ (४१ षटके)
सामना अनिर्णित.
जॅरेट पार्क, माँटेगो बे

२री महिला कसोटी

संपादन
१४-१६ मे १९७६
धावफलक
वि
२२६ (१३४ षटके)
पॅट्रिसिया व्हिटटेकर ६१
मारी कॉर्निश ५/५१ (३७ षटके)
२१८ (१२१.३ षटके)
जॅनेट ट्रेड्रिया ४३
विव्हालिन लॅटी-स्कॉट ३/३६ (३३.३ षटके)
८९/३ (३५ षटके)
लुसी ब्राउन ५२*
ॲनी गॉर्डन २/१८ (७ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका