ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ ४ कसोटी सामने खेळतील. दक्षिण आफ्रिकेवरची बंदी उठविल्यानंतर या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांची ही मालिका प्रथमच खेळविण्यात येत आहे. कसोटी मालिकेआधी तीनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ फेब्रुवारी २०१८ – ३ एप्रिल २०१८ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी | स्टीव स्मिथ टिम पेन (तिसरी कसोटीचा ५वा दिवस आणि चौथी कसोटी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एडन मार्करम (४८०) | कॅमेरुन बँक्रोफ्ट (२२३) | |||
सर्वाधिक बळी | कागिसो रबाडा (२३) | पॅट कमिन्स (२२) | |||
मालिकावीर | कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) |
कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याने केली.
संघ
संपादनकसोटी मालिका | |
---|---|
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया |
दौरा सुरू होण्याआधी दुखापतीमुळे जॅक्सन बर्ड संघातून बाहेर पडला. त्याच्या जागी चॅड सेयर्सला संघात सामील केले गेले.[१]. टेंबा बावुमाला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामना खेळू शकला नाही.
दौरा सामने
संपादनप्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि ऑस्ट्रेलियन्स
संपादन
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१-५ मार्च २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- मिचेल मार्श (ऑ) ने १,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकारामुळे खेळ लवकर थांबवण्याय आला.
२री कसोटी
संपादन९-१३ मार्च २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- एस. रवी (भा) यांनी क्रिस गॅफने (न्यू) यांच्या अनुपस्थितीत कसोटीच्या दुसऱ्या दिवसापासून पंचगिरी केली.
- शॉन मार्श (ऑ) याने २,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
३री कसोटी
संपादन२२-२६ मार्च २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- डीन एल्गार (द.आ.) ने ३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
- मॉर्ने मॉर्केल (द.आ.) दक्षिण आफ्रिकेसाठी ३०० कसोटी बळी घेणारा ५वा गोलंदाज ठरला.
- सामन्याच्या ४थ्या दिवशी टिम पेनने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
- नेथन ल्यॉन (ऑ) ऑस्ट्रेलियासाठी ३०० कसोटी बळी घेणारा ६वा गोलंदाज ठरला.
चेंडूत अफरातफर
संपादनतिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला दूरचित्रवाणीवर चेंडूवर काहीतरी वस्तू घासत असताना टिपले गेले. अधिक चौकशीनंतर संघनायक स्टीव स्मिथने कबूल केले की स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि संघनेतृत्वाने बँक्रॉफ्टला असे करण्यास सांगितले होते. सामनाधिकाऱ्याने स्मिथ आणि वॉर्नरवर एक कसोटी सामन्याची बंदी घातली. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना अर्ध्या सामन्यात संघनायक आणि उपनायकपदावरून काढून टाकले व यष्टीरक्षक टिम पेनला काळजीवाहू संघनायक म्हणून नेमले.[२]
या कृतीची जगभर निर्भत्सना झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलॅंड आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व अधिकाऱ्यांनी ही घटना ऑस्ट्रेलियातील क्रिकेटला लाजिरवाणी असल्याचे म्हणले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना १ वर्ष व प्रत्यक्ष कृती करणारा सहखेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला ९ महिन्यांची बंदी घातली.
४थी कसोटी
संपादन३० मार्च - ३ एप्रिल २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : चॅड सेयर्स (ऑ)
- मॉर्ने मॉर्केलचा (द.आ.) हा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.
- टिम पेन (ऑ) याने ऑस्ट्रेलियाचा ४३वा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले.
- व्हर्नॉन फिलान्डर (द.आ.) याने २००वा कसोटी बळी घेतला.
- कसोटीत धावांच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय.
- कसोटीत धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात मोठा पराभव. (याआधी १९२८ मध्ये ब्रिस्बेन येथे इंग्लंडविरुद्ध ६७५ धावांनी पराभव)
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "चॅड सेयर्सला ऑस्ट्रेलिया संघात स्थान, जॅक्सन बर्ड दुखापतग्रस्त".
- ^ "स्टीव स्मिथ banned for one Test, Bancroft given three demerit points". ESPNcricinfo. 2018-03-26 रोजी पाहिले.