ऑक्टाव्हियो पाझ लोझानो (स्पॅनिश: Octavio Paz Lozano; ३१ मार्च १९१४–१९ एप्रिल १९९८) हे एक मेक्सिकन कवी, लेखक व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. १९६० च्या दशकात पाझ भारतातले मेक्सिकोचे राजदूत होते.

ऑक्टाव्हियो पाझ
Octavio Paz - 1988 Malmö.jpg
जन्म ३१ मार्च १९१४ (1914-03-31)
मेक्सिको सिटी, मेक्सिको
मृत्यू १९ एप्रिल, १९९८ (वय ८४)
मेक्सिको सिटी, मेक्सिको
राष्ट्रीयत्व मेक्सिकन
कार्यक्षेत्र लेखक, कवी
पुरस्कार नोबेल पुरस्कार

भारतातील वास्तव्याचा त्यांच्या लेखनावर प्रगाढ प्रभाव आहे असे मानले जाते. “एल लाबिरिन्तो दे ला सोलेदाद” (“एकांताचा भुलभुलैय्या”), “एल मोनो ग्रामातिको” (“वानर व्याकरणकार”), व “लादेरा एस्ते” (“पुर्वेकडचे उतार”) ही त्यांची मुख्य ललित पुस्तके आहेत. याशिवाय त्यांची वीसहून अधिक काव्यसंग्रहे प्रकाशित आहेत. त्यातल्या अनेकांचे जगभरातील अनेक भाषांत अनुवाद उपलब्ध आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

मागील
कमिलो होजे झेला
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९०
पुढील
नेडीन गॉर्डिमर