ऐतिहासिक नाटक हे ऐतिहासिक कथा व व्यक्तिरेखांवर आधारित नाटक होय. यातील कथानक काही सत्य आणि काही काल्पनिक गोष्टींवर आधारित असते. बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते, ही श्रींची इच्छा अशी शिवकालीन नाटके आहेत. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी मात्र 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे प्रतापराव गुजर आणि 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे छत्रपती राजाराम महाराज व संताजी- धनाजी यांच्या स्वराज्य संरक्षणासाठी केलेल्या अभूतपूर्व संघर्षावर आधारित ऐतिहासिक नाटके लिहिली आणि पुण्याच्या 'भरत नाट्य मंदिरात' त्यांचे व्यवसायिक प्रयोग ही यशस्वीपणे सादर केले.[][]

  1. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  2. ^ अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021