एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली
एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियानिर्मित क्षेपणास्त्र प्रणाली आहे.ही सद्यकाळातील एक आधूनिक व लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशी प्रणाली आहे.
ही एक अत्याधूनिक जहाजभेदी, विमानभेदी व क्षेपणास्त्रभेदी प्रणाली आहे.या प्रणालीत एकाच वेळी ३६वेळा शत्रूच्या विमानांवर मार करण्याची क्षमता आहे. शीर्षकातील ४०० हा शब्द म्हणजे ४०० किमी पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असा आहे. यात १२ लॉंचर असतात व यातून एकावेळी ३ क्षेपणास्त्र डागल्या जाऊ शकतात.
पूर्वपिठिका
संपादनही क्षेपणास्त्र प्रणाली रशियातर्फे विकसित करण्यात आलेली आहे. इ. सन १९६७ मध्ये सोव्हीयेत रशियाने आपली एस २०० ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली. याचे नाव अंगारा क्षेपणास्त्र प्रणाली होते व नंतर एस ३०० ही प्रणाली सन १९७८ मध्ये विकसित केली.
एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियाने इ.स. २००७ मध्ये विकसित केलेली प्रणाली आहे. यापुढे, तो देश एस ५०० विकसित करीत आहे.
भारताने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याबाबत नुकताच रशियाशी करार केला आहे.