एरंडगाव
एरंडगाव हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे.
?एरंडगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गेवराई |
जिल्हा | बीड |
तालुका/के | गेवराई |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | एरंडगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 431127 • +०२४४७ • MH23 |
लोकसंख्या
संपादनया गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार १०५ कुटुंब असून लोकसंख्या ८३७ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या ४९४ तर स्त्रीयांची संख्या ४४३ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ८३ असून ते एकूण लोकसंख्येच्या १० % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ६८ (८%) असून त्यात ४० पुरूष व २८ स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे ४२ लोक (५%) असून त्यात २६ पुरूष व १६ स्त्रिया आहेत.[१]
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंब | |||
लोकसंख्या | |||
मुले (० ते ६ ) | |||
अनु. जाती | |||
अनु. जमाती | |||
साक्षरता | % | % | % |
एकूण कामगार |
साक्षरता
संपादन- एकूण साक्षर लोकसंख्या:
- साक्षर पुरुष लोकसंख्या:
- साक्षर स्त्री लोकसंख्या:
ग्रामसंसद
संपादनइ.स.१९६२ साली ग्रामपंचायतची स्थापना झाली. डिसेंबर - २०२२ मध्ये नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली.यामध्ये सरपंच पद ना.मा.प्र. महिला राखीव होते.या निवडणुकी मध्ये सौ.रत्नमाला संतोष लाखे यांची सरपंच पदी तर दत्तप्रसाद आश्रुबा जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाली.ग्रामपंचायत सदस्य पदी बप्पासाहेब प्रल्हाद लाखे,सौ.सुनीता सतीश लाखे, सौ.कालिंदा सुरेश प्रधान,सौ.कविता अमोल लाखे,सुग्रीव मदन लाखे,सौ.जिजाबाई लक्ष्मण लाखे यांची निवड झाली.
शैक्षणिक सुविधा
संपादनजिल्हा परिषद प्राथमिक शाळा,एरंडगाव ही शाळा आहे.येथे १ ली ते ५ वी.पर्यंत शाळा आहे.
आरोग्य केंद्र
संपादन- प्राथमिक आरोग्य केंद्र — निपाणी जवळका
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — आहेर वाहेगाव
- पशुवैद्यकिय दवाखाना — पाचेगाव
- अंगणवाडी — एरंडगाव
पिण्याचे पाणी
संपादन- सार्वजनिक विहिरी — २
- खाजगी विहिरी — ३०
- बोअर वेल — ३०
- हातपंप — ४
- पाण्याची टाकी — २
- नळ योजना — २
- स्टॅंडपोस्ट —
- नळ कनेक्शन — १००
- वाटर फिल्टर — १
नद्या
संपादनएरंडगाव हे सिंधफना नदी काठावर वसलेले आहे.तसेच या गावाजवळ सिंदफना नदी व बिंदुसरा नदीचा संगम आहे.
स्वच्छता
संपादनगावामध्ये स्वच्छता असते.
संपर्क व दळणवळण
संपादनया गावातून पाचेगाव ,एरंडगाव, हिरापुर मार्गे बीडला रस्ता येतो.तसेच एरंडगाव ,पाचेगाव,निपाणी जवळका मार्गे गेवराई ला जातो.
बाजार
संपादनया गावातील लोक पाचेगाव व हिरापुर येथे आठवडी बाजार करतात.
लोकजीवन
संपादनया गावातील बहुतांश लोक शेती करतात.या गावातील अर्थचक्र शेतीवर अवलंबून आहे.
धार्मिक स्थळे
संपादनया गावात हनुमान मंदिर आहे.
आरोग्य
संपादनप्राथमिक उपचार घेण्यासाठी पाचेगाव येथे जावे लागते.
वीज
संपादनथ्री फेज व सिंगल फेज वीज उपलब्ध असते.
उत्पादन
संपादनया गावात ऊस व कापूस मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.