एम्मा वॉटसन

(एमा वॉटसन या पानावरून पुनर्निर्देशित)

एम्मा शार्लोट डुएरे वॉटसन ( १५ एप्रिल १९९०)[१] एक इंग्रजी अभिनेत्री, मॉडेल आणि कार्यकर्ता आहे.[२] पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि ऑक्सफोर्डशायर मध्ये वाढलेल्या एम्माने ड्रॅगन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि स्टेजकोच थिएटर आर्ट्सच्या, ऑक्सफोर्ड शाखेत अभिनेत्री म्हणून प्रशिक्षण घेतले. लहान वयात, एम्माला हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकेत, हरमायनी ग्रेंजर म्हणून अभिनयाची भूमिका मिळाली व ती खुप गाजली. पूर्वी एम्माने फक्त शालेय नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या.[३] एम्मा इ.स २००० च्या दशकात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती.[४]

एम्मा वॉटसन
जन्म एम्मा शारलोएट डुएरे वॉटसन
१५-एप्रिल-१९९०
पॅरिस, फ्रांस
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००१ - चालू
प्रमुख चित्रपट हॅरी पॉटर ॲंड द फिलॉसॉफर्स स्टोन
वडील ख्रिस वॉटसन
आई जाक्युलीन लुएसबी
टिपा

२००७ मध्ये बॅले शूज या पुस्तकाच्या टेलीव्हिजन मालिकेत एम्माने भुमिका केली आणि तिने "द टेल ऑफ डेस्पीरॉक्स" (२००८) या चित्रपटात पार्श्व स्वर दिला. हॅरी पॉटर मालिकेतील शेवटच्या चित्रपटानंतर तिने माय व्हिक व्हिथ मर्लिन (२०११), "द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर" (२०१२) आणि "द ब्लिंग रिंग" (२०१३) मधील मुख्य भूमिका आणि इतर भूमिका साकारल्या. "दिस इज द एंड" (२०१३) मध्ये एम्माने स्वतःची अतिशयोक्तीपूर्ण आवृत्ती म्हणून भूमिका साकारली[५], आणि "नोव्हा" (२०१४) मध्ये दत्तक मुलीचे भुमिका निभावली.[६]. २०१७ मध्ये, तिने "ब्यूटी अँड द बीस्ट" चित्रपटात, बेलेची भूमिकेत केली. तिच्या इतर भूमिकांमध्ये "रिग्रेशन" (२०१५), "कोलोनिया" (२०१५) आणि "द सर्कल" (२०१७) यांचा समावेश आहे.

२०११ ते २०१४ पर्यंत एम्माने आपला चित्रपटांवर काम चालु ठेवत, शिक्षण पण केले व तिने ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि "वॉरेस्टर कॉलेज, ऑक्सफोर्ड" येथे शिक्षण घेऊन मे २०१४ मध्ये इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली.[७] तिच्या मॉडेलिंगच्या कामात बर्बेरी आणि लॅन्कोमेच्या मोहिमांचा समावेश सुद्दा आहे.[८][९] "पीपल ट्री" नावाच्या कपड्यांच्या ब्रॅंन्डच्या काही उत्पादनासाठी तिने आपले नाव वापरू दिले.[१०]. २०१४ मध्ये ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन आर्ट्स या संस्थेमार्फत तीला ब्रिटीश आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.[११]. त्याच वर्षी, तिला यूएन महिला सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आणि यूएन महिला अभियानासाठी तिने खुप् हातभार लावले.[१२]


सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण संपादन

एम्माचा जन्म पॅरिसमध्ये झाला, व जॅकलिन लेस्बी आणि ख्रिस वॉटसन हे इंग्रजी वकिल तिचे पालक होते.[१][१३][१४]. एम्मा, पाच वर्षांची होईपर्यंत पॅरिस जवळील मैसन-लॅफिट येथे राहत होती. तिच्या लहान वयात, तिच्या पालकांचा घटस्फोट झाला ज्यामुळे ती लंडनमध्ये ऑक्सफोर्डशायर येथे आपल्या आई सोबत व शनिवार/रविवारी लंडनमधिल आपल्या वडिलां सोबत राहत असे.[१][१५]. एम्माने स्पष्टीकरण दिले की तीला फ्रेंच भाषा बोलता येते, पण पुर्वीसारखी स्पष्ट नाही.[१६] आपल्या आई आणि भावासोबत ऑक्सफोर्ड येथे गेल्यानंतर, तिने ड्रॅगन स्कूलमध्ये २००३ पर्यंत शिक्षण घेतले.[१] वयाच्या सहाव्या वर्षापासून तिला अभिनेत्री व्हायचं होते[१७], आणि तिने स्टेजकोच थिएटर आर्ट्सच्या, ऑक्सफोर्ड शाखेत, तिने गायन, नृत्य आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.[१८]

वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत एम्माने स्टेजकोच प्रॉडक्शन व "आर्थरः द यंग इयर्स" आणि "द हैप्पी प्रिन्स"[१९] या शालेय नाटकांमध्ये नाटक केले होते, परंतु हॅरी पॉटर मालिकेपूर्वी तिने कधीही व्यावसायिक अभिनय केलेला नव्हता. ड्रॅगन स्कूलनंतर एम्मा ऑक्सफोर्डच्या हेडिंग्टन स्कूल मध्ये गेली.[१] चित्रपटाच्या सेट्सवर असताना, ती आणि तिचे साथीदार दिवसातुन पाच तासांपर्यंत सराव करत असत.[२०] जून २००६ मध्ये, तिने जी.सी.एस.ईच्या १० विषयांमध्ये परीक्षा दिल्या, ज्यात ८ विषयांमध्ये "ए" आणि २ विषयांमध्ये "ए ग्रेड" मिळवले. मे २००७ मध्ये तिने इंग्रजी, भूगोल, कला आणि कलेचा इतिहास या विषयांची जी.सी.ईची प्रगत पातळीची परिक्षा दिली.. पुढच्या वर्षी, इंग्रजी, भूगोल, कला या विषयांमध्ये ए ग्रेड मिळवण्यासाठी तिने कलेचा इतिहास विषया सोडला.[१][२१][२२]

कार्किद संपादन

१९९९-२००३: कार्किद सुरुवात आणि यश संपादन

१९९९ मध्ये, हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोनया चित्रपटच्या पात्रांना निवडण्याची प्रक्रिया (कास्टिंग) सुरू झाली. हा चित्रपट जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटर कादंबऱ्यांच्या शृंखलेतील, हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्ज स्टोन या पुस्तका वर आधारीत आहे. पात्र निवडणाऱ्या प्रतिनिधीने (कास्टिंग एजंट्सने) एम्माला तिच्या ऑक्सफोर्ड थिएटरच्या शिक्षकाद्वारे शोधले आणि निर्माते तिच्या आत्मविश्वासामुळे प्रभावित झाले. आठ ऑडिशन्सनंतर (चाचण्यानंतर), निर्माता डेव्हिड हेमान यांनी एम्मा, डॅनियल रॅडक्लिफ आणि रूपर्ट ग्रिंट यांना सांगितले की त्यांना हॅरी पॉटरच्या शालेय मित्र हरमायनी ग्रेंजर, हॅरी पॉटर आणि रॉन विजलीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. रोलिंगने तिच्या पहिल्या स्क्रीन टेस्टमधून एम्माचे समर्थन केले.

चित्रपट संपादन

वर्ष शीर्षक भूमिका Notes
२००१ हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन हरमायनी ग्रेंजर
२००२ हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स हरमायनी ग्रेंजर
२००४ हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान हरमायनी ग्रेंजर
२००५ हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर हरमायनी ग्रेंजर
२००७ हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स हरमायनी ग्रेंजर
२००८ द टेल ऑफ डेस्पीरॉक्स राजकुमारी पी पार्श्व स्वर
२००९ हॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स हरमायनी ग्रेंजर
२०१० हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १ हरमायनी ग्रेंजर
२०११ हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २ हरमायनी ग्रेंजर
२०११ माय व्हिक व्हिथ मर्लिन लुसी
२०१२ द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर सॅम
२०१३ द ब्लिंग रिंग निकी मूर
२०१३ दिस इज द एंड स्वतः
२०१४ नोव्हा इला
२०१५ कोलोनिया Lena
२०१५ रिग्रेशन ॲंजेला ग्रे
२०१७ ब्यूटी अँड द बीस्ट बेले
२०१७ द सर्कल मे हॉलंड
२०१९ लिटील व्हिमेन मार्गारेट "मेग" मार्च

संदर्भ संपादन

 1. ^ a b c d e f "Life & Emma". Emma Watson official website. 16 April 2010.
 2. ^ "Check If You're a British Citizen". United Kingdoms Government. UK Government Digital Service.
 3. ^ "Daniel Radcliffe, Rupert Grint and Emma Watson to Reprise Roles in the Final Two Instalments of Warner Bros. Pictures' Harry Potter Film Franchise". 23 March 2007. Archived from the original on 2012-08-05. 2009-08-04 रोजी पाहिले.
 4. ^ "Emma Watson: Decade's Highest-Grossing Actress". ExtraTV.com. 2019-11-17.
 5. ^ "This Is the End – and It's Hilarious". USA Today. 11 June 2013.
 6. ^ "Emma Watson Gets Biblical With Darren Aronofsky's 'Noah'". indiewire.com. 7 June 2012.
 7. ^ "Emma Watson Graduates from Brown University". The Telegraph (UK). 25 May 2014.
 8. ^ "Go Behind the Scenes with Emma Watson on the Burberry Shoot". Vogue News. २२ June 2009. Archived from the original on 2014-09-03. 2019-12-05 रोजी पाहिले.
 9. ^ "Emma Watson Named New Face of Lancome". The Huffington Post. 14 March 2011.
 10. ^ "Emma Watson launches ethical fashion range with People Tree". The Guardian. UK. 17 September 2009.
 11. ^ "At BAFTA Event, Emma Watson Dedicates Award to Her Long Dead Hamster". Los Angeles Times. 31 October 2014.
 12. ^ "Emma Watson named UN Women Goodwill Ambassador". The Independent. 8 July 2014.
 13. ^ "Warner Bros. Official site". Adobe Flash. harrypotter.warnerbros.co.uk.
 14. ^ "A life after Harry Potter". The Sydney Morning Herald. 16 March 2006.
 15. ^ "Emma Watson, The Graduate". The New York Times. 17 August 2012.
 16. ^ "Q&A with Emma Watson – The Hour Publishing Company: Entertainment News". Thehour.com. 18 December 2008. Archived from the original on 2014-09-03. 2019-12-05 रोजी पाहिले.
 17. ^ "Emma". Emma Watson's Official Website. 3 August 2007.
 18. ^ Reece, Damian (4 November 2001). "Harry Potter drama school to float". The Daily Telegraph.
 19. ^ "Emma & Screen". Official Website. 16 April 2010. Archived from the original on 2010-05-07. 2019-12-05 रोजी पाहिले.
 20. ^ "Cast Interviews". 15 May 2004.
 21. ^ "Pupils 'sitting too many GCSEs'". BBC News. 24 August 2006.
 22. ^ "A-Level results of the stars: Emma Watson, Benedict Cumberbatch, Matt Smith, Jenna Coleman – and the Doctor..." Radio Times. 17 August 2017.

External links संपादन