डॉ. एन. राजम ( रामनवमी, १९३८) ह्या एक भारतीय व्हायोलिनवादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवतात.[१] त्या काही वर्षे बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये संगीताच्या प्राध्यापिका होत्या. त्यांना २०१२ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला.

डॉ. एन. राजम
आयुष्य
जन्म रामनवमी १९३८
जन्म स्थान चेन्नई
संगीत कारकीर्द
कार्य व्हायोलीन वादन
पेशा वादक
गौरव
पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षणसंपादन करा

एन. राजम ह्यांचा जन्म १९३८ साली चेन्नईतील एका संगीतमय कुटुंबात झाला. त्यांच्या घरी सात पिढ्या कर्नाटकी संगीत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा राजदरबारात वादक होते. त्यांचे वडील, विद्वान ए.नारायण अय्यर हे कर्नाटकी संगीतातले एक मोठे नाव.[१] ते गायक आणि वीणावादक होते. राजम ह्यांचे बंधू टी.एन. कृष्णन हेसुद्धा एक व्हायोलिनवादक आहेत.[२] राजम ह्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडीलांकडे व्हायोलिनचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील काही काळ मुंबईला राहत असल्याने त्यांच्यावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रभाव पडला होता. त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांमध्ये एकाने तरी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकावे. त्यांनी राजम ह्यांना बनारस हिंदू विद्यापीठात पाठवले. तिथे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हा मुख्य विषय ठेवण्यास सांगितला. पण राजम १२ वर्षे कर्नाटकी संगीत शिकलेल्या असल्यामुळे त्यांना सोपे गेले, असे त्या म्हणतात. मुसिरी सुब्रमणीया अय्यर ह्यांच्याकडे आणि रागांमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांनी गायक ओंकारनाथ ठाकूर ह्यांच्याकडे ही शिक्षण घेतले. ओंकारनाथ ठाकूर ह्यांच्याकडे शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या वादनावर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव दिसतो. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून एम. सुब्बलक्ष्मी ह्यांच्याबरोबर साथीसाठी भारतभर दौरे केले.त्या गायकी अंगाचे व्हायोलिन वाजवतात. त्या म्हणतात की ह्या प्रकारचे व्हायोलिन वाजवणे सोपे नव्हते. गायकी अंगाचे व्हायोलिन वाजवण्याचे कौशल्य गाठण्यासाठी त्यांना पंधरा वर्षे प्रयत्न करावे लागले. आपल्या वडलांच्या मदतीने राजम ह्यांनी गायकी अंगासाठी रियाज केला.राजम ह्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरवले गेले आहे.

कारकीर्दसंपादन करा

त्यांनी बॉस्टन, अमेरिका,नेदरलँड्स बेल्जियम, ॲम्स्टरडॅम, इत्यादी देशात आणि भारतात खूप ठिकाणी आपली कला सादर केली आहे. राजम ह्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात चाळीस वर्षे ललित कलांच्या शिक्षिका म्हणून काम केले. त्या काही वर्षे ह्याच विभागाच्या डीन होत्या. आणि काही काळातच त्या विभाग प्रमुख झाल्या. त्यांची कन्या डॉ. संगीता शंकर, नाती रागिणी शंकर आणि नंदिनी शंकर ह्यांच्याबरोबर परंपरा नावाचा कार्यक्रम त्यांनी विविध देशांमध्ये सादर केला आहे.[३] उदाहरणार्थ नेदरलँड्स आणि इतर. त्यांनी वसंतोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, आरोही फॉर पंचम निषाद इत्यादी महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे.[४]

विद्यार्थीसंपादन करा

त्यांनी त्यांच्या कन्या संगीता शंकर, त्यांच्या नाती रागिणी शंकर आणि नंदिनी शंकर, त्यांची भाच्ची कला रामनाथ आणि अशा अनेक लोकांना व्हायोलीन वादन शिकवले.[५]

पुरस्कारसंपादन करा

 • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९०[६]
 • पद्मश्री, १९८४[७]
 • पद्मभूषण, २००४[८]
 • पुत्तराज सन्मान, २००४
 • द आर्ट & म्युझिक फाउंडेशन, पुणे ह्यांचा पुणे पंडित पुरस्कार
 • संगीत नाटक अकादमी फेलोशीप (अकादमी रत्न), २०१२[९]

प्रकाशित ध्वनी मुद्रिकासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ a b "N Rajam biography". Last.fm (इंग्रजी भाषेत). 2020-03-30 रोजी पाहिले.
 2. ^ "T.N. Krishnan age, biography". Last.fm (इंग्रजी भाषेत). 2020-03-30 रोजी पाहिले.
 3. ^ "Sound of strings strung together". The New Indian Express. 2020-03-30 रोजी पाहिले.
 4. ^ "N. Rajam | sawai gandharva bhimsen mahotsav". sawaigandharvabhimsenmahotsav.com. 2020-03-30 रोजी पाहिले.
 5. ^ ":: Rajam School of Violin ::". violinschool.net. 2020-03-30 रोजी पाहिले.
 6. ^ "SNA || List of Awardees". sangeetnatak.gov.in. 2020-03-30 रोजी पाहिले.
 7. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2020-03-30 रोजी पाहिले.
 8. ^ "Padma Awards 2004". https://www.outlookindia.com/. 2020-03-30 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
 9. ^ "Sangeet Natak Akademi Fellowship for the Year 2012". Current Affairs Today (इंग्रजी भाषेत). 2020-03-30 रोजी पाहिले.
 10. ^ "n.rajam music | Discogs". www.discogs.com. 2020-03-30 रोजी पाहिले.
 11. ^ "N. Rajam - Dr. Smt. N. Rajam". Discogs (इंग्रजी भाषेत). 2020-03-30 रोजी पाहिले.
 12. ^ "N. Rajam - Maestro's Choice". Discogs (इंग्रजी भाषेत). 2020-03-30 रोजी पाहिले.