एचएमएस व्हिक्टरी
एच.एम.एस. व्हिक्टरी नावाच्या रॉयल नेव्हीच्या सहा नौका होत्या.
- इंग्लिश नौका व्हिक्टरी (१५६९) - ४२ तोफा असलेली नौका. ग्रेट क्रिस्टोफर नावाने बांधली गेलेली ही नौका रॉयल नेव्हीने १५६९मध्ये विकत घेतली व १६०८मध्ये भंगारात काढली.
- एच.एम.एस. व्हिक्टरी (१६२०) - ४२ तोफा असलेली नौका. १६२०मध्ये डेप्टफोर्ड येथे बांधलेली आणि १६६६मध्ये ८२ तोफा चढवलेली सेकंड रेट नौका. १६९१मध्ये भंगारात काढली गेली.
- एच.एम.एस. व्हिक्टरी (१६७५) - १०० तोफा असलेली फर्स्ट-रेट नौका. ही १६७५मध्ये रॉयल जेम्स नावाने बांधली गेली. हीचे मार्च ७, इ.स. १६९१ रोजी पुनर्नामकरण केले गेले. १६९४-९५मध्ये पुनर्बांधणी झाल्यावर फेब्रुवारी १७२१मध्ये आगीत भस्मसात झाली.
- एच.एम.एस. व्हिक्टरी (१७३७) - १०० तोफा असलेली फर्स्ट-रेट नौका. १७४४मध्ये इंग्लिश चॅनलमध्ये बुडाली. २००८मध्ये हिचा शोध लागला.
- एच.एम.एस. व्हिक्टरी (१७६४) - आठ तोफा असलेली स्कूनर. कॅनडामध्ये सेवारत असताना १७६८ साली जाळली गेली.
- एच.एम.एस. व्हिक्टरी (१७६५) - जगातील सगळ्यात प्रसिद्ध युद्धनौकांपैकी एक असलेली ही १०० तोफांची फर्स्ट-रेट नौका अजूनही शाबूत आहे. हीने अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, नेपोलियनिक युद्धे, उशांतची लढाई, केप व्हिंसेन्टची लढाई यांत भाग घेतला. ट्राफालगारच्या लढाईत ही नौका लॉर्ड नेल्सनच्या हुकुमात होती.
याशिवाय रॉयल नेव्हीच्या जवळपास आठ तळांना एच.एम.एस. व्हिक्टरी नाव देण्यात आले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |