एंजेल स्टेडियम
एंजेल स्टेडियम तथा एंजेल स्टेडियम ऑफ ॲनाहाइम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ॲनाहाइम शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. १९६६मध्ये बांधलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस एंजल्सचे घरचे मैदान आहे. १९८०-९४ दरम्यान नॅशनल फुटबॉल लीगचा लॉस एंजेलस रॅम्स संघ हे मैदान वापरत असे.