ऊर्जा गंगा हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्‌घाटन केलेला एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामधे नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठी २५४० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या पाईपलाईनने भारताच्या पूर्व भागास लाभ होईल. या पाईपलाईनचा मार्ग जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धामरी असा राहील. या प्रकल्पासाठी रुपये १२,४९० कोटी इतका अंदाजित खर्च होणार आहे. या योजनेचा लाभ उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसापश्चिम बंगाल या राज्यांतील ४० जिल्ह्यांना व २६०० खेड्यांना होणार आहे.[]

या पाईपलाईनचे काम २०१८ - २०२० या कालावधीत पूर्ण केले जाईल. या प्रकल्पाने वाराणसी शहरातील लोकांना पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस मिळेल. नंतर या योजनेतून ५०,००० घरांना व २०,००० वाहनांना अनुक्रमे पीएनजी व सीएनजी गॅस पुरविण्यात येईल. या कामातून ग्रामीण भागात दरवर्षी सुमारे ५ लाख गॅस सिलेंडर्स पुरविण्यात येतील, असा सरकारचा अंदाज आहे. भारत सरकारची 'गेल' ही कंपनी या कामासाठी सुमारे एकूण ११,००० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकणार आहे.[]

या योजनेचा कोलकाता, कटक, भुवनेश्वर, रांची, पाटणा, जमशेदपूर, वाराणसी या मोठ्या शहरांना लाभ मिळेल.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "ऊर्जा गंगा: हाऊ पीएम मोदीज् ॲम्बिशिअस गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट विल बेनेफिट वाराणसी ॲंड ईस्टर्न इंडिया" (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे

संपादन